वासरू मराठी कविता पाचवी | Class 5 Vasaru Marathi Kavita | कवि अनिल वासरू कविता इयत्‍ता पाचवी

  • Post comments:0 Commentsवासरू मराठी कविता पाचवी | Class 5 Vasaru Marathi Kavita | कवि अनिल वासरू कविता इयत्‍ता पाचवी

वासरू
ऐका. म्हणा. बाचा.
ओढाळ वासरू रानी आले फिरू,
कळपाचा घेरू सोडूनिया.
कानामध्ये वारे भरूनिया न्यारे,
फेर धरी फिरे रानोमाळ.
मोकाट मोकाट अफाट अफाट,
वाटेल ती वाट धावू लागे.
विसरूनी भान, भूक नि तहान,
पायांखाली रान घाली सारे.
थकूनिया खूप सरता हुरूप,
आठवे कळप तयालागी.
फिरू जाता मागे दूर जाऊ लागे,
आणखीच भागे भटकत.
पडता अंधारू लागले हंबरू,
माय! तू लेकरू शोधू येई.
– अनिल

शब्दार्थ : ओढाळ – स्वच्छंदी, मनात येईल तसे फिरणारे. फिरू – फिरायला. घेरू – घेराव, न्यारे – वेगळे. फेर धरणे – गोलगोल फिरणे. मोकाट – कोणतेही बंधन न पाळणे, स्वैरपणे फिरणे. भान – जाणीव. हुरूप – उत्साह, जोम, जोश. आठवे – आठवण येणे. भागे – दमून, थकून. ।
स्वाध्याय
प्र. १. एक-दोन बाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते?
(आ) तहान, भूक विसरून वासरू काय करते?
(इ) वासराला कळपाची आठवण केव्हा होते ?
२. खालील अर्थांच्या कवितेतील ओळी शोधा व लिहा.
(अ) भूक, तहान विसरून वासरू रानात सगळीकडे फिरते. (आ) वासरू रानात फिरून फिरून थकले, की त्याचा उत्साह कमी होतो. मग त्याला आपला कळप आठवू लागतो.
(इ) वासरू कळपाकडे परत यायला निघते, पण त्याला रस्ता सापडत नाही. ते दूर जाऊ लागते.
असे भटकल्यामुळे ते आणखीनच थकून जाते.
प्र. ३. कळपातून निघालेले वासरू रानात कसे फिरू लागले, याचे वर्णन तुमच्या शब्दांत सांगा.
प्र. ४. खालील शब्दसमूह व वाक्प्रचार यांचा अर्थ समजून घेऊन त्यांचा वाक्यात उपयोग करा,
कानांमध्ये वारे भरणे,
हुरळून जाणे,
रान पायांखाली घालणे,
सगळीकडे फिरणे,
तहानभूक विसरणे,
मग्न होणे,
हुरूप येणे,
मोकाट सुटणे.
प्र. ५. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
(अ) शाळेची मधली सुट्टी झाली, की तुम्ही काय काय करता?
(आ) खेळायला गेल्यानंतर तुम्ही घरी लवकर परतला नाहीत तर तुमची आई काय करते?
(इ) तुम्ही तहानभूक केव्हा विसरता? प्र. ६. ‘मोकाट-अफाट-बाट’ याप्रमाणे शेवटचे अक्षर समान असलेले कवितेतील शब्द शोधा.
प्र. ७, ‘रानोमाळ सारखे पाच जोडशब्द लिहा.
प्र. ८, सोडूनिया, थकूनिया यांसारखे शब्द कवितेत आले आहेत. ते नेहमी लिहिताना ‘सोडुनिया, थकुनिया
असे लिहितात, या शब्दांप्रमाणे खालील शब्द लिहा.
जेवून, झोपून, खेळून, येऊन, जाऊन, बोलून. प्र. ९. ‘एखादे मूल आईपासून किंवा कुटुंबापासून गर्दीत हरवले,’ असा प्रसंग तुम्ही पाहिला आहे का? असा प्रसंग तुमच्यावर कधी आला होता का ? त्या वेळी काय घडले ते सांगा.
खानील चित्रांना विशेषणे लावा.
सशक्त

• ओळखा पाह!
बत्तीस भाऊ, एकच बहीण सर्वांत तीच आयुष्यमान.
चार बोटांचे अंतर दोघांत असे एकावर विश्वास. तर दसऱ्यावर नसे…
बारा घरावर दोघे पहारा करती सदैव फिरती, न थकती, न थांबती.

#कविअनिल
#वासरूकविता
#वासरू
#Class5Vasaru
#KaviAnilVasaruKavita
#Std5Vasaru

मराठी मुळाक्षरे
https://bit.ly/2WsE4kr
इयत्‍ता पहिली सर्व कविता/पाठ
https://bit.ly/35CpHhG
इयत्‍ता दुसरी सर्व कविता/पाठ
https://bit.ly/2yjtft0
इयत्‍ता तिसरी सर्व कविता/पाठ
https://bit.ly/3c1B5G4
चौथी मराठी
https://bit.ly/2SyE29u
पाचवी मराठी
https://bit.ly/2xCrOp8
चौथी परिसर अभ्‍‍‍‍‍यास १
https://bit.ly/3c5hWTC
चौथी परिसर अभ्‍‍‍‍‍यास २
https://bit.ly/3dfhsdX
वार्षिक/घटक नियोजन
https://bit.ly/2SSDn2H

Join me …….
Like on Facebook: https://bit.ly/2VZgxbC
Facebook Page: https://bit.ly/2xxzx7L
Follow on Instagram: https://bit.ly/2WrF4oG
My Blog: https://bit.ly/2zcJkR1
Follow on twitter: https://bit.ly/35Jsndm
वासरू मराठी कविता पाचवी | Class 5 Vasaru Marathi Kavita | कवि अनिल वासरू कविता इयत्‍ता पाचवी
#वसर #मरठ #कवत #पचव #Class #Vasaru #Marathi #Kavita #कव #अनल #वसर #कवत #इयतत #पचव
वासरू मराठी कविता पाचवी | Class 5 Vasaru Marathi Kavita | कवि अनिल वासरू कविता इयत्‍ता पाचवी
#वसर #मरठ #कवत #पचव #Class #Vasaru #Marathi #Kavita #कव #अनल #वसर #कवत #इयतत #पचव

visit youtube channel

Leave a Reply